जि.प. केंद्र मराठी शाळा झुरखेड्यात विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

झुरखेडा |
जिल्हा परिषद केंद्र मराठी शाळा, झुरखेडा येथे ग्रामपंचायत झुरखेडा यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच अशा प्रकारचा स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पोर्ट्स ड्रेस परिधान केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी भागातील तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत पुढे जाऊ शकतात, आपण कोणत्याही बाबतीत कमी नाही, हा आत्मविश्वास या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेशआप्पा पाटील, उपसरपंच श्री. बबननाना पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. रविंद्रआप्पा निळे यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास पाटील, गजानन माळी, संजय गायकवाड, चौधरी मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांच्या मेहनत, नियोजन आणि सहकार्यामुळे शाळेत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत झुरखेडा, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!


