झुरखेडा येथे संस्कार वर्गात भारत माता आरतीचे उत्साहात आयोजन

धरणगाव : तालुक्यातील झुरखेडा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झुरखेडा येथील संस्कार वर्गाच्या माध्यमातून भारत माता आरतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. संस्कार वर्गाच्या पालक, ग्रामपंचायत सदस्या तथा ॲड. कल्पना पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.विद्यार्थ्यांमध्ये अखंड भारताविषयी आत्मीयता, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजावी, या उद्देशाने भारत माता आरतीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या घरून पणत्या, दिवे, तेल, वात आदी साहित्य आणले. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे भारत मातेची आकर्षक रांगोळी साकारून आरती केली. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय तसेच देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. त्यानंतर देशकार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांसोबत पालक, महिला, पुरुष तसेच ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.भारत माता आरतीच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि संस्कारांची जडणघडण करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कार वर्गातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.